22 जानेवारी रोजी खेलो इंडिया अंतर्गत ॲथलेटिक्स खेळाची निवड चाचणी
चंद्रपूर, दि. 12 : केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयाने खेलो इंडिया सेंटर अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मैदानी ॲथलेटिक्स या खेळ प्रकाराचे अनिवासी केंद्र मंजूर केले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय 14 व 16 वर्षाआतील मुले व मुली खेळाडू निवड चाचणी दि. 22 जानेवारी 2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
चंद्रपूर शहरातील तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळेतील खेळाडू सहभागी होण्याच्या दृष्टीने दि. 22 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजता जन्म दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. 2021 या वर्षातील जिल्हास्तरीय खेलो इंडिया निवड चाचणीतून काही जागा शिल्लक असल्याने, 2023 या वर्षात शिल्लक जागा भरण्यात येणार आहे. याकरीता मुले/मुली यांची निवड चाचणी घेण्यात येईल. खेळाडूंनी सहभागी होऊन या निवड चाचणीचा लाभ घेण्याचे आवाहन, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.