भाडे पट्टेधारकांनी नझुल लिजचे नुतणीकरण करून घ्यावे

भाडे पट्टेधारकांनी नझुल लिजचे नुतणीकरण करून घ्यावे

 

भंडारा दि 9: तुमसर शहरातील नझुल लिज भाडेपट्टेधारकांना सुचित करण्यात येते की, शासनाकडून वाटप करण्यात आलेल्या नझुल लिज भाडेपट्यांसबंधाने पडताळणी करण्याबाबत तसेच लिज नुतणिकरण राबविण्यासबंधाने विशेष मोहिम राबविण्यासंबंधाने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी निर्देश दिली आहे.

तुमसर शहरामध्ये एकूण 233 लिज भाडेपट्टे शासनाकडून वाटप करण्यात आलेले आहे. भाडेपट्टेधारकांनी विनापरवानगी वापरात बदल, हस्तांतरण करून शर्तभंग केलेला आहे किंवा कसे याबाबत शोध घेण्याकरीता तलाठी यांना 12-12 भाडेपट्टे विभागून देण्यात आलेले आहे. तलाठी पथक हे भाडेपट्टयांची जागा पाहणी करण्याकरीता उद्या 10 जानेवारी रोजी येणार असून पथक आवश्यक चौकशी करून अहवाल सादर करणार आहे व त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. तरी आपण पथकास सहकार्य करावे, ज्या भाडे पट्टेधारकांनी अद्यापही नझुल लिजचे नुतणिकरण करून घेतले नाही त्यांनी त्वरित आपला नझुल लिजचे नुतणीकरण करून घेण्याचे आवाहन तुमसरचे तहसिलदार बी.डी. टेळे यांनी केले आहे.