गडचिरोली | भारतीय मानक ब्यूरो बाबत प्रशिक्षण संपन्न

भारतीय मानक ब्यूरो बाबत प्रशिक्षण संपन्न

गडचिरोली, दि.09 : जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यालयातील सर्व विभागप्रमुखांना भारतीय मानक ब्युरो या बाबतचे प्रशिक्षण नागपूर प्रादेशिक कार्यालयामार्फत देण्यात आले. विविध विभागांमार्फत योजनेत साहित्य खरेदी होत असते, या अनुषंगाने भारतीय मानक ब्युरोबाबत विविध सादरीकरण यावेळी पियुष वासेकर, सह संचालक व संदेश गोकंणवार केले. यावेळी भारतीय बाजारात दिलेल्या मानकांबाबत, बीआयएस तपशील, प्रक्रिया व महत्त्व सांगण्यात आले. सर्वसाधारण बाजारात विविध साहित्य पुरवठादारांना बीआयएस मानक घेणेबाबत प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक खरेदीत मानंकाविषयी विचारणा करून मानक असलेल्या वस्तूच खरेदी कराव्यात असे त्यांनी यावेळी सांगितले. यातून चांगल्या गुणवत्तेचे साहित्य बाजारात उपलब्ध होतील. तसेच पुरवठादारही चांगल्या साहित्याची निर्मिती करतील हा उद्देश प्रशिक्षणाचा असल्याचे श्री. वासेकर यांनी यावेळी सांगितले.

 

भारतीय मानक ब्युरो मिळालेल्या साहित्याचे तपशील देत त्यांनी विभागाच्या संकेतस्थळाविषयी माहिती दिली व विभागाच्या मोबाईल ॲपचेही सादरीकरण केले. शेतीविषयक, कार्यालयीन साहित्य, अन्न, इलेक्ट्रीक वस्तू आदी मधे कशा प्रकारे साहित्याला बीआयएस दिले जाते याबाबत त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.