सार्वजनिक ठिकाणी लागलेले अनधिकृत होर्डिंग, बॅनर नियमानुसार हटवावे · नगरपालिका व नगर परिषदांचा जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर यांनी घेतला आढावा.

सार्वजनिक ठिकाणी लागलेले अनधिकृत होर्डिंग, बॅनर नियमानुसार हटवावे

· नगरपालिका व नगर परिषदांचा जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर यांनी घेतला आढावा.

 

भंडारा, दि. 6 : नगरपरिषदांनी आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यरत सर्व शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी. शहर विद्रूप करणारे अवैध होर्डिंग ,बॅनर फ्लेक्स हे तातडीने हटवण्यात यावे. तसेच अवैध अतिक्रमणावर ही नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी काल दिले. जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांचा आढावा घेताना ते बोलत होते. त्यावेळी नगरपालिका प्रशासन सहआयुक्त चंदन पाटील व सातही नगरपरिषदांचे मुख्य अधिकारी मुख्याधिकारी उपस्थित होते. रुजू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिका प्रशासनाचा योजनांनीहाय आढावा घेतला.

 

स्थानिक क्षेत्रात नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था असून त्यांनी कर स्वरूपात मिळणारे निधी संकलन करावे म्हणजे त्या क्षेत्रातील विकासासाठी तो निधीB उपलब्ध होईल. 100% कर संकलनाचे उद्दिष्ट सर्व नगरपालकांनी ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले .नगरपालिका अंतर्गत महिला बचतगटांचे सक्षमीकरण करण्यासाठी ठोस प्रयत्न करण्यात यावे,तसेच मुख्याधिकार्यांच्या अडचणी त्यानी जाणून घेतल्या.