म्हशींचे बाजार भरविणे आणि जिल्ह्यांतर्गत गुरांच्या वाहतुकीस मान्यता Ø जिल्हाधिका-यांनी पारित केले आदेश 

म्हशींचे बाजार भरविणे आणि जिल्ह्यांतर्गत गुरांच्या वाहतुकीस मान्यता Ø जिल्हाधिका-यांनी पारित केले आदेश 

 

चंद्रपूर, दि. 6 : लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्यात जनावरांचे (गाय / बैल / म्हैस) सर्व बाजार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष यांच्या आदेशान्वये 12 सप्टेंबर 2022 पासून बंद करण्यात आले होते. परंतु जनावरे विक्री करण्याचा सर्वसामान्यांचा व्यवसाय तसेच शेतक-यांचे आर्थिक हित लक्षात घेता राज्य शासनाच्या अधिसुचनेनुसार राज्यात फक्त म्हशींचे बाजार सुरू करणे तसेच जिल्ह्यांतर्गत गुरांच्या वाहतुकीस मान्यता मिळाली असल्याने 6 जानेवारी 2023 च्या जिल्हाधिका-यांच्या आदेशान्वये आता चंद्रपूर जिल्ह्यात फक्त म्हशींचे बाजार भरविणे आणि गुरांच्या वाहतुकीस मान्यता देण्यात आली आहे.

 

जिल्ह्यातील जनावरांचे (म्हशींचे) बंद करण्यात आलेले बाजार कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थापन प्रशासनाद्वारे सुरू करण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंगेश काळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुडकर यांनी केले आहे.