मोहाडी येथील कोल्ड स्टोरेज प्रकल्पाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

मोहाडी येथील कोल्ड स्टोरेज प्रकल्पाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

 

भंडारा, दि. 6 : मोहाडी येथील मित्राय शेतकरी उत्पादक कंपनीच्या कोल्ड स्टोरेज प्रकल्पाला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भेट दिली.यावेळी या उत्पादक कंपनीचे संचालक प्र फफुल बांडेबुचे यांनी या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

 

यामध्ये कोल्ड स्टोरेजमध्ये कांदा,टोमॅटो,मिरची यांची साठवणूक करण्यासाठी आवश्यक ती साठवणक्षमता उपलब्ध आहे.त्यानंतर भंडारा सिल्क उदयोगाला ही त्यांनी भेट दिली.यावेळी व्यावसायिक पध्दतीने करण्यात येत असलेल्या या उदयोगाविषयीची संपूर्ण माहिती त्यांनी घेतली.तुती बाग लागवड कान्हळगाव ,तेजस्विनी रेशीम वस्त्र उदयोग आंधळगाव,तर वनविभागाच्या मिश्र रोपवन,सालेबर्डी येथेही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देवून पाहणी केली.

यावेळी दौऱ्यात उपविभागीय अधिकारी बी.वैष्णवी,गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर,माविमचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप काठोडे यासह कृषी,वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.