शुभमंगल योजनेअंतर्गत सामुहिक विवाह सोहळे आयोजित करण्याचे आव्हान

शुभमंगल योजनेअंतर्गत सामुहिक विवाह सोहळे आयोजित करण्याचे आव्हान

 

भंडारा, दि. 5 : जिल्ह्यात “शुभमंगल सामुहिक/नोंदणीकृत विवाह योजना” शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अनुदानास पात्र ठरण्यासाठी वार्षीक कमाल उत्प्नन मर्यादा एक लाख इतकी असुन अश्या कुटूंबातील मुलीच्या विवाहासाठी प्रती जोडपे 10 हजार एवढे अनुदान देण्यात येते व सामुहिक विवाह सोहळे आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रती जोडप्यामागे 2 हजार एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान विवाहाचे आयोजन, तसेच विवाह नोंदणी शुल्क यावर होणारा खर्च भागविण्यासाठी देण्यात येते.

 

तरी जिल्ह्यातील सर्व सक्रिय स्वयंसेवी संस्थांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा सदर योजनेअंतर्गत जास्तीत जास्त सामुहिक विवाह सोहळे आयोजित करुन अनुदानास पात्र कुटूंबातील मुलींच्या विवाहासाठी मदत करण्याचे आव्हान जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, भंडारा यांनी केले आहे.