येत्या शनिवारी ग्रा.रू. सिहोरा येथे मानसिक आरोग्य तपासणी शिबिर

येत्या शनिवारी ग्रा.रू. सिहोरा येथे मानसिक आरोग्य तपासणी शिबिर

 

भंडारा, दि. 5 : शनिवार 7 जानेवारी 2023 रोजी, ग्रा.रू. सिहोरा येथे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, आरोग्य विभागा मार्फत आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने मानसिक आजार, डोकेदुखी, उदास पणा, चिंता रोग, व्यसन समस्या, आत्महत्या प्रतिबंध, फिट आजार, झोपेचे आजार तसेच हृदय रोग, मधुमेह, ब्लड प्रेशर, परालिसिस या आजारावर उपचार व मार्गदर्शन करण्यात येईल.

त्या सोबत आहार व योगा या विषयावर तज्ञ व्यक्तीकडून व्यवस्थापन करण्यात येईल. या कार्यक्रमात मानसिक रोग तज्ञ, फिजिशियन, योग मार्गदर्शक तसेच आहार तज्ञ उपस्थित राहणार आहेत. तेव्हा सीहोरा व आजूबाजूचे प्रा.आ. के. यांनी आपल्या अधिनस्थ असलेले अधिकारी व कर्मचारी यांना या बद्दल माहिती द्यावी. जेणेकरून ज्यांच्या साठी हे शिबिर ठेवण्यात येत आहे त्यांना लाभ घेता येईल.