एकलव्य निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता इयत्ता 6 वी ते 9 वी साठी निवासी प्रवेशाबाबत
गडचिरोली,दि.01: प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी, जि.गडचिरोली यांचे कार्यक्षेत्रा अंतर्गत अहेरी, मुलचेरा, सिरोंचा हे तीन तालुके येत असून सदर तालुक्यातील इयत्ता 6 वी, 7 वी, 8 वी, 9 वी मध्ये प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता एकलव्य रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेश घेण्याबाबत इच्छुक पालकांनी विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी व शासकीय अनुदानित आदिवासी मुला / मुलींचे वसतिगृह येथून विनामुल्य अर्ज प्राप्त करुन दिनांक 31 जानेवारी 2023 पर्यत सादर करावे. इयत्ता 6 वी ते 9 प्रवेश मिळण्याकरिता अर्टी व शर्ती पुढील प्रमाणे आहे.
सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छीनारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. पालकांचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले अनुसूचित जमातीच्या दाखल्याची सांक्षाकित प्रत सादर करावी. कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न 6 लक्ष इतके मर्यादित राहील. पालक दारिद्रय रेषेखाली असेल तर त्या संबधाचा दाखला जोडावा. शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये इयत्ता 5 वी तसेच 6 वी ते 8 वी चे वर्गात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे निवड स्पर्धा परिक्षेच्या माध्यामातून करण्यात येईल. व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यानांच प्रवेश देता येईल. खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश कोणतेही वेळी रद्द करण्यात येईल.
निवड झालेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकांच्या व पाल्यांचा विनंती नुसार शाळा बदलता येणार नाही. याबाबत पालकांनी हमी पत्र सादर करावे. आदिम जमातीच्या विद्यार्थ्यासाठी 5% जागा आरक्षित राहील. तसेच अनुसूचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्यासाठी 3% जागा आरक्षित राहील. असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी यांनी कळविले आहे.