एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कूल प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कूल प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

Ø 30 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

चंद्रपूर, दि. 28: आदिवासी विकास विभाग अंतर्गत, चंद्रपूर प्रकल्पात कार्यान्वीत असलेल्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कूल, देवाडा ता. राजुरा मध्ये इयत्ता 6 वी प्रवेशाकरीता व इयत्ता 7 वी ते 9 वीच्या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरण्यासाठी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी तसेच इयत्ता 6वी ते 8वीच्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व इतर प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शिक्षण घेत असलेल्या पंरतू ज्या अनुसुचित जमाती / आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 6 लक्ष पेक्षा कमी आहे, अशा अनुसूचित जमाती व आदिम जमातीच्या पाल्यांना स्पर्धा परीक्षेस प्रविष्ठ होण्याकरीता आवेदन पत्र मागविण्यात येत आहे.

आवेदन पत्र शासकीय,अनुदानित आश्रमशाळा,शासकीय वसतीगृह व प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर येथे उपलब्ध आहे. सदर स्पर्धा परीक्षेचे आयोजन दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत करण्यात येणार आहे. परीक्षेकरीता आवेदन करण्याचा अंतिम दि. 30 जानेवारी 2023 पर्यंत असणार आहे.

आवेदन पत्र नजिकच्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व इतर शासनमान्य प्राथमिक, माध्यमिक शाळा याठिकाणी उपलब्ध आहे. संबधित शाळांमधील मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त विद्यार्थी प्रविष्ठ करावे. असे आवाहन चंद्रपूर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी केले आहे.