जिल्ह्यातील 20 आरोग्य संस्थांना राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार जाहीर

जिल्ह्यातील 20 आरोग्य संस्थांना राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार जाहीर

 

Ø 3 उपजिल्हा रुग्णालय, 4 ग्रामिण रुग्णालय व 13 प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश

 

चंद्रपूर, दि. 24: केंद्र शासनाने शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण व वैद्यकिय सेवेचा दर्जा वाढविण्यासाठी 2015 पासुन कायाकल्प पुरस्कार योजना सुरु केली आहे. या योजनेत सन 2021-22 मध्ये जिल्हयातील एकुण 20 संस्थांना राज्यस्तरावरुन पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

 

यामध्ये प्रथम पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र, दुर्गापुर बक्षीस रक्कम रु. 2 लक्ष, उपजिल्हा रुग्णालय वरोरा, मुल, चिमुर व ग्रामिण रुग्णालय राजुरा, बल्लारपुर, ब्रम्हपुरी व सावली यांना गौरव पुरस्कार रु. 1 लक्ष तर प्राथमिक आरोग्य केंद्र माढेळी, विसापुर, नवेगाव मोरे, चिचपल्ली, चौगान, नवेगाव पां., पाथरी, नारंडा, घोडपेठ, मो. नलेश्वर, भिसी, चिरोली यांना गौरव पुरस्कार रु. 50 हजार असे एकुण 15 लक्ष रुपये पुरस्काराची रक्कम असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिली.

 

या योजनेत सर्व उपजिल्हा व ग्रामिण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्राचा सहभाग होता. पुरस्कारासाठी रुग्णालयाची अंतर्गत व बाहय परिसर स्वच्छता, निर्जतुकीकरण, बेड स्वच्छता, उपलब्ध साधनांचा वापर, अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, रुग्णसेवा, बायोमेडीकल घन व द्रवरुप कचऱ्याची विल्हेवाट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व पाणी बचत, सांडपाण्याचा निचरा आदी प्रत्येक बाबींसाठी गुण निश्चित केले आहे. आय.एस.ओ मानांकनाच्या शर्तीवरील या पुरस्कारासाठी आरोग्य संस्थेतील अधिकारी व कर्मचारी सुविधा उपलब्ध करुन स्वतः तपासणी (सेल्फ असेसमेंट) करुन प्रस्ताव देतात. त्यानुसार जिल्हा व राज्यस्तरीय समितीकडुन तपासणी केली जाते. 70 टक्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या संस्थांना प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच प्रोत्साहनपर रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांच्या मार्गदर्शनात कायाकल्प कार्यक्रमातुन आरोग्य केंद्राचे बळकटीकरण व सेवांचा दर्जा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. दरवर्षी मोठया संख्येने आरोग्य संस्थांना पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देतात. यामुळेच जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांना यावर्षी पुरस्कार प्राप्त झाला आहे.