2 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन

2 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन

 

भंडारा, दि. 21 : सोमवार 2 जानेवारी 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, परिषद कक्षात दुपारी 1 वाजता जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही दिनाच्या 15 दिवसाआधी जनतेच्या तक्रारी/अर्ज संकीर्ण शाखा जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे दोन प्रतीत स्वीकारण्यात येईल. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/अपील प्रकरणे, सेवाविषयक, आस्थापना विषयक, सामुहीक कामासंबंधीत तसेच तालुका लोकशाही दिनी सादर न केलेले तक्रारी व अर्ज स्वीकारण्यात येणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांनी कळविले आहे.