अनाथ असल्यास अनाथ प्रमाणपत्र प्राप्त करा

अनाथ असल्यास अनाथ प्रमाणपत्र प्राप्त करा

गडचिरोली, दि.20: महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक -अनाथ -2018/प्र.क्र.182/का-03 दिनांक 23 ऑगस्ट 2021 नुसार बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,2015 अन्वये काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या अनाथ,निराधार बालकांना संस्थेतून बाहेर पडल्यानंतर जातीचा दाखला नसल्यामुळे विविध शासकीय लाभांपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतीचा लाभ घेता यावा याकरिता वर्गीकृत अ,ब,क नमुन्यात अनाथ प्रमाणपत्र वितरीत करण्यात येत आहे. या नुसार अनाथांना शिक्षण व नोकरीत यामध्ये 1% आरक्षण लागू करण्यात आलेला आहे.गडचिरोली जिल्ह्यात आता पर्यंत 52 अनाथ बालकांना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने अनाथ प्रमाणपत्र वितरीत करण्यात आलेले आहे.नुकत्याच झालेल्या गडचिरोली पोलीस भरती मध्ये शितल फुलचंद कुळमेथे या बालिकेची पोलीस शिपाई म्हणून अनाथ प्रवर्गातून निवड झालेली आहे.आपणास अनाथ प्रमाणपत्र पाहिजे असल्यास अधिक माहिती करिता जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक -०७१३२२२२६४५ तसेच Email Id depu.gadchiroli@gmail.com यावर किंवा कवेश्वर लेनगुरे संरक्षण अधिकारी(संस्थात्मक) मोबाईल क्र.९५९५६४४८४८ यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी केले आहे.

 

अनाथ प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे:- विहित नमुन्यातील लाभार्थी यांचा अर्ज,वडिलांचा मृत्युचा दाखला,

आईचा मृत्युचा दाखला,जातीचा दाखला,लाभार्थी बालक यांचे आधार कार्ड,लाभार्थी पालकांचे आधार कार्ड,लाभार्थी यांचा जन्माचा दाखला,शाळेत शिकत असल्याचे प्रमाणपत्र(बोनाफाईड)किंवा TC,अनाथ असल्याबाबत ग्रा.प.न.प.यांचे शिफारस प्रमाणपत्र,पासपोर्ट साईज 05 फोटो, सर्व कागदपत्रे हे तीन बंच फाईलसह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सादर करावे.