नवजात बालकांना मिळणार आधार कार्ड शासकीय व खासगी रुग्णालयात मिळणार आधार – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर         

नवजात बालकांना मिळणार आधार कार्ड शासकीय व खासगी रुग्णालयात मिळणार आधार – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर         

 

भंडारा, दि. 20 : कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असते. असे हे आधार कार्ड आता जिल्ह्यातील नवजात बालकांना त्यांचा जन्म झाला त्या रुग्णालयातच मिळणार आहे. यासाठी आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्हा तंत्रज्ञान अधिकारी संदीप लोखंडे व महा आयटीचे जिल्हाप्रमुख फारूक यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

 

शासकीय रुग्णालयामध्ये जन्मताच जन्म दाखला मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र खाजगी रुग्णालयांनाही तशा पद्धतीची सुविधा रुग्णांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. प्रसूतीसाठी गरोदर माता किमान तीन दिवस रुग्णालयात दाखल असतात. त्या तीन दिवसांमध्ये जन्मल्याबरोबर बाळाचा जन्म दाखला व त्या जन्म दाखल्याच्या आधार कार्ड देण्यात येतील. त्यामुळे पाल्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यामध्ये याचा फायदा होईल. दहा वर्षापूर्वी काढलेले आधारकार्ड अपडेट करणे आवश्यक असून जिल्ह्यातील ज्या नागरिकांना आधार नोंदणी करुन दहा वर्ष कालावधी पूर्ण झाला आहे, त्यांनी आपले आधारकार्ड अपडेट करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे. आधारकार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होत असतात. जसे पत्ता, नावातील चुका, मोबाईल क्रमांक यासह अनेकदा एकापेक्षा अधिक आधार कार्ड नोंदणी झाले असल्याचीही शक्यता असते. आधारकार्डला संबंधितांची माहिती नोंद असल्याने यासर्व नोंदीचे अद्यावतीकरण होणे आवश्यक असते. त्यासाठी दहा वर्षांनी आधार ईकेवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना आधारकार्ड काढून दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. त्यांनी आपल्या नजीकच्या आधार केंद्रावर जाऊन केवायसी करुन घेणे आवश्यक आहे.

यासाठी शासनाने 50 रुपये इतके शुल्क निर्धारित केले आहे. ज्या नागरिकांनी आपल्या पाल्यांचे अद्यापही आधारकार्ड काढलेले नाही त्यांनी आधारकार्डसाठी ऑनलाईन नोंदणी करावी व ज्यांचा आधारकार्ड काढून दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. त्यांनी आपले आधारकार्ड अपडेट करुन घ्यावे.