निवृत्तीवेतन धारकांना सुचना

निवृत्तीवेतन धारकांना सुचना

 

भंडारा, दि. 13 : जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतन धारकांना सुचित करण्यात येते की, सन 2022-23 या आर्थिक वर्षात ज्यांचे वार्षीक उत्पन्न 5 लक्ष रूपयां पेक्षा जास्त असेल त्यांनी आयकरातून सुट प्राप्त संबंधीचे दस्ताऐवज 25 डिसेंबर 2022 पुर्वी कोषागार कार्यालय, भंडारा येथे सादर करावे. अन्यथा आयकर नियमानुसार आयकर कपात करण्यात येईल. आयकर गणनेसाठी टॅक्स कपातीचे नवीन नियम व जुने नियम असे दोन प्रकार ठरविण्यात आले आहे. त्यानुसार आयकर कपातीच्या नियमाच्या प्रकारानुसार लेखी कळवावे, असे जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण पत्की यांनी कळविले आहे.