रोबोटीक्स व इलेक्ट्रानिक्स प्रशिक्षण कार्यक्रम युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 9 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूरद्वारे पुरस्कृत 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या अनुसुचित जाती गटातील युवक व युवतींकरीता दि. 23 डिसेंबर ते 22 जानेवारी 2023 (एक महिना) कालावधीचे रोबोटीक्स व इलेक्ट्रानिक्स प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण रोज सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 वाजताच्या कालावधीत पार पडणार आहे.
प्रशिक्षणामध्ये ब्रेड बोर्ड काय आहे?, रेक्टिफायर, फिल्टर सर्किट, पॉवर सप्लाय, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट, आयसी 555 ची उपयोगिता, मायक्रोकंट्रोलरचे प्रकार व रोबोटिक्सचे प्रात्यक्षिक तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, पशुधन विकास कार्यालयाच्या योजना व व्यवसाय संधी आदी विषयांवर विशेष तज्ञ व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षणात प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक-युवतींनी 22 डिसेंबर 2022 पर्यंत www.mced.co.in या वेबसाईटवर अर्ज करावा. सदर प्रशिक्षणाच्या मुलाखतीकरिता दि. 22 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता पहीला माळा, निर्मल वाचनालयाच्या वर गुरुद्वारा रोड, तुकूम, येथे आधारकार्ड, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका व दोन पासपोर्ट साईज फोटो घेवून हजर राहावे. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के व्ही. राठोड (मो.नं. 9403078773,07172-274416) व कार्यक्रम आयोजक स्मिता पेरके(मो.नं. 9175229413) यांच्याशी संपर्क साधावा.