12 डिसेंबर पासून मौजा सोनापुर येथील गावठाण मालकी जागेच्या सर्वेक्षणाचे चौकशी काम सुरु होणार
गडचिरोली, दि.07: मोजा सोनापुर ता.जि.गडचिरोली येथील नगर भुमापन हंदीतील मिळकतीचे सविस्तर मोजणी काम पुर्ण झाल्यामुळे मालकी हक्क घोषीत करण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम चे कलम 20 (2) अन्वये चौकशी काम दिनांक 12 डिसेंबर 2022 पासून सुरु होणार आहे. तरी सदर चौकशी वेळी चौकशी अधिकारी तथा उपिअधिक्षक भुमी अभिलेख व कर्मचारी हे प्रत्यक्ष मिळकतीच्या ठिकाणी (जागेवर) येणार आहेत व मालकी हक्क घोषीत करुन मिळकत पत्रिका (आखिव पत्रिका) तयार होणार आहेत. तरी मौजा सोनापुर येथील मिळकतधारकांनी आपले कागदपत्रे चौकशी वेळी चौकशी अधिकारी/कर्मचारी यांचेकडे सादरकरुन सहकार्य करावे. तसेच जे मिळकत धारक चौकशी वेळी मिळकत संबधी कागदपत्रे सादर करु शकत नाही त्यांनी 10 दिवसाचे आत उपअधिक्षक भुमी अभिलेख,गडचिरोली यांचे कार्यालयात आवश्यक दस्ताऐवज सादर करावे.
तसेच मौजा देवापुर रिठ येथील 20 (2) चौकशी काम (मालकी हक्काबाबत) पुर्ण झाले असून ज्या मिळकत धारकांनी कागदपत्र/दस्ताऐवज सादर केले नसल्यास दिनांक 31 डिसेंबर 2022 पावेतो उपअधिक्षक भुमी अभिलेख,गडचिरोली यांचे कार्यालयात सादर करावे. तदनंतर आपले काही ही म्हणणे नाही असे समजून पुढील कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन उप अधिक्षक भूमी अभिलेख, गडचिरोली, नंदा आंबेकर यांनी केले आहे.