स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे – नुतन सावंत
स्वच्छतेसाठी होणार गावांचे स्वयं मुल्यांकन
चंद्रपुर दिनांक 02/12/2022 केंद्रसरकार कडुन देशात स्वच्छ सर्वेक्षण(ग्रामीण) 2023 राबविल्या जात असुन , याद्वारा गावाची स्वच्छतेच्या अनुषंगाने तपासणी होणार आहे. यासाठी सर्व ग्रामपंचायतींना स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपुर जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी नुतन सावंत यांनी केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, देशात स्वच्छ सर्वेक्षण(ग्रामीण) 2023 ला सुरुवात झाली असुन, यांअतर्गत गावांची स्वच्छतेच्या विविध घटकावर आधारीत तपासणी केल्या जाणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)2023 मध्ये जिल्यातील सर्व ग्रामपंचायतींना सहभागी व्हायचे आहे. ग्रामपंचायतींना स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक गावाचे स्वयं मुल्याकन करणे अनिवार्य आहे . त्या शिवाय सहभाग नोंदनी होत नाही. स्वयं मुल्यांकन भरण्यासाठी Egramswaraj च्या संकेत स्थळावर लिंक उपलब्ध करून दिली आहे. https://sbm.gov.in/SSG2023/ODFPLusRanking.aspx या लिंकच्या माध्यमातुन प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वयं मुल्याकन भरणे अनिवार्य आहे.अन्यथा SSG २०२३ मध्ये सदर ग्रामपंचायत सहभाग घेण्यास पात्र ठरणार नाही. स्वयं मूल्यांकनात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत गावात झालेल्या कामाची माहिती नोंदीत करावयाची आहे. एका गावाचे स्वयं मुल्यांकन भरण्यासाठी जास्तीत जास्त २५ मिनिटांचा कालावधी लागतो. तरी प्रत्येक गावाचे प्रथम स्वयं मुल्यांकन १५ डिसेम्बर २०२२ पूर्वी पूर्ण करण्यात यावे. अशा सुचना सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना जिल्हास्तरावरुन देण्यात आल्या आहे.
” स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)2023 मध्ये सहभागी होण्याची सर्व ग्रामपंचायतींना संधी असुन, ईग्रामस्वराज च्या संकेतस्थळावर जावुन संबधी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी यांनी दिलेल्या लिंकद्वारा प्रत्येक गावाचे स्वयं मुल्याकन करावे. – नुतन सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ,पाणी व स्वच्छता.