अतिवृष्‍टीमुळे झालेल्‍या नुकसान भरपाईबाबत बैठक घेवून तोडगा काढण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश Ø पोंभुर्णा व गोंडपिपरी तालुक्यासंदर्भात 2 डिसेंबर रोजी होणार बैठक

अतिवृष्‍टीमुळे झालेल्‍या नुकसान भरपाईबाबत बैठक घेवून तोडगा काढण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Ø पोंभुर्णा व गोंडपिपरी तालुक्यासंदर्भात 2 डिसेंबर रोजी होणार बैठक

 

चंद्रपूर, दि. 1 : खरीप हंगाम जुन – जुलै 2022 मध्‍ये झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे पिकांच्‍या झालेल्‍या नुकसानासंदर्भात शासनाने तीन हेक्‍टरपर्यंत नुकसान भरपाई मंजूर केली. मात्र पोंभुर्णा आणि गोंडपिपरी तालुक्‍यातील शेतक-यांचा नुकसान भरपाई संदर्भातील निधी बॅंकेला मिळाला नसल्याचे अनेक तक्रारी प्राप्‍त झाल्‍या आहेत. या तक्रारींची तातडीने दखल घेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना बैठक घेवून शेतक-यांचे प्रश्‍न सोडविण्‍याचे निर्देश दिले आहे.

 

या शेतक-यांच्या नुकसानीचे सर्व्‍हेक्षण होवून शासनाकडून निधी प्राप्‍त झाला आहे, अशा शेतक-यांच्‍या याद्या ग्राम पंचायत स्‍तरावर जाहीर करण्‍याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. याबाबत 2 डिसेंबर रोजी पोंभुर्णा व गोंडपिपरी तहसिल कार्यालय येथे लोकप्रतिनिधी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांची संयुक्‍त बैठक होणार असून यासंदर्भात योग्‍य तोडगा काढण्‍यात येणार आहे.