जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे विधी सेवा चिकित्सालयाची स्थापना

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे विधी सेवा चिकित्सालयाची स्थापना

 

भंडारा, दि. 30 : जिल्हा कारागृह वर्ग-1 भंडारा येथे विधी सेवा चिकित्सालयाची स्थापना करण्यात आली असून विधी सल्ला चिकित्सालयाचे उद्घाटन राजेश गो. अस्मर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांच्या हस्ते करण्यात आले.

 

आर्थिक दुर्बलतेमुळे कुणीही न्यायापासून वंचित राहू नये म्हणून सदर विधी सल्ला केंद्रामार्फत कारागृहातील आरोपींना मोफत कायदेविषयक सल्ला दिला जाईल. तसेच सदर चिकित्सालयाच्या माध्यमातून जे कैदी/आरोपी प्रकरण चालविण्याकरिता अधिवक्ता नियुक्त करू शकत नाही अशा आरोपींची चौकशी करून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडाराला कळविण्यात येईल. विधी सेवा प्राधिकरण अशा आरोपींना त्यांच्या प्रकरणात अधिवक्ता नियुक्त करेल. अशा प्रकरणांत आरोपींना अधिवक्तांना फी देण्याची गरज नाही. सदर विधी सल्ला केंद्राचे उद्घाटनावेळी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बिजु बा. गवारे, प्रभारी अधिक्षक, जिल्हा कारागृह वर्ग-1 अमृत आगासे, कारागृह अधिकारी, जिल्हा कारागृह वर्ग-1 क्षीरसागर, अधिवक्ता रेणुका बेदरकर, विधी स्वयंसेवक वैशाली गायधने तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा व जिल्हा कारागृह वर्ग-1 चे कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी जिल्हा कारागृहातील सर्व बंदीगृहामध्ये जावून प्रत्येक आरोंपीशी संवाद साधून त्यांना काही अडचण व तक्रारी आहे/नाही याबाबत चौकशी केली तसेच त्याना त्यांच्या अधिकाराबाबत मार्गदर्शन केले.