चंद्रपूर येथे 9 व 10 डिसेंबर रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन Ø जिल्हाधिका-यांनी घेतली आढावा बैठक

चंद्रपूर येथे 9 व 10 डिसेंबर रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन

Ø जिल्हाधिका-यांनी घेतली आढावा बैठक

चंद्रपूर, दि. 30 : शासकीय जिल्हा ग्रंथालयाद्वारे चंद्रपूर येथे 9 आणि 10 डिसेंबर 2022 रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथोत्सव सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली.

जिल्ह्यात ग्रंथोत्सवाचे आयोजन होत असल्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिका-यांनी शाळांमध्ये वाचन संस्कृतीशी निगडीत विविध उपक्रम, वत्कृत्व स्पर्धा आदींचे नियोजन करावे. तसेच यासंदर्भात जिल्हा ग्रंथालय कार्यालयाने संबंधित विभागांशी समन्वय ठेवून ग्रंथोत्सवाचा दोन दिवसीय उपक्रम अतिशय चांगला पध्दतीने पार पाडावा, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

 

9 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात येईल. त्यानंतर उद्घाटन व दोन दिवसात कवी संमेलन, परिसंवाद, नाटिका, वाचन संस्कृती वाढविण्यासाठी चर्चासत्र, कथाकथन, मुलाखत आदींचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी पुस्तकांचे स्टॉलसुध्दा लावण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी भीमराव जिवणे, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे (प्राथमिक), कल्पना चव्हाण (माध्यमिक), जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार, पुस्तक विक्रेता संघाचे निखील तांबेकर, साहित्यिक इरफान पठान, जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचे नवल कवडे आदी उपस्थित होते.