आचार संहितेमुळे लोकशाही दिन रद्द

आचार संहितेमुळे भंडारा येथील लोकशाही दिन रद्द

 

भंडारा, दि. 28 : शासन परिपत्रक दिनांक 26 सप्टेंबर 2012 अन्वये जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे प्रत्येक महिन्याच्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीची आचारसंहिता असल्यामुळे दिनांक 5 डिसेंबर 2022 रोजी सोमवारला जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.