मतदार यादी निरीक्षक 28 नोव्हेंबरला भंडारा जिल्ह्यात
भंडारा, दि. 24 : भारतीय निवडणूक आयोगाच्या 2 ऑगस्ट 2022 रोजीच्या पत्रान्वये 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. भारतीय निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार नागपूर विभागीय आयुक्त यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी तपासणाच्या अनुषंगाने मतदार यादी निरीक्षक म्हणून एकूण तीन भेटी देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त नागपूर ह्या भंडारा येथे 28 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता प्रथम भेटीबाबत येणार आहे.
मतदार यादी तपासणीच्या अनुषंगाने 28 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता परिषद कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त नागपूर ह्या आढावा घेणार असून बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, खासदार, आमदार, मान्यता प्राप्त राजकीय पक्ष व जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित राहणार आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी कळविले आहे.