साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना

 

भंडारा, दि. 21 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजने अंतर्गत अनुसूचित जातीतील मांग/ मातंग व या समाजातील बारा पोट जातीतील दारिद्रय रेषेखालील गरजू घटकांची आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेच्या कर्जाची मर्यादा 25 हजार रूपयांवरून 1 लक्ष रूपर्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, भंडारा येथे दिनांक 2 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करावे, असे जिल्हा व्यवस्थापक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत कळविण्यात आले आहे.