अमृत अभियान 2022 अंतर्गत 21 नोव्हेंबर रोजी सभेचे आयोजन
भंडारा, दि. 18 : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, त्यांच्या विधवां व सेवारत सैनिक यांना सुचित करण्यात येते की, 21 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता अमृत अभियान 2022 अंतर्गत माजी सैनिक, विधवा व सेवारत सैनिक यांच्या समस्या सोडविण्यासाठी तहसिल कार्यालय भंडारा येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. समस्या असल्यास आपला अर्ज 18 नोव्हेंबर 2022 पर्यंत तहसिल कार्यालय, भंडारा येथे सादर करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आकाश अवतारे, यांनी केले आहे.