गडचिरोली | खरीप पणन हंगाम 2022-23 धान खरेदी केंद्र सुरु

खरीप पणन हंगाम 2022-23 धान खरेदी केंद्र सुरु

 

गडचिरोली, दि.18: महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक, उप प्रादेशिक कार्यालय, अहेरी (उच्च श्रेणी) अंतर्गत शासनाच्या निर्देशानुसार आधारभुत किंमत खरेदी योजना खरीप पणन हंगाम 2022-23 साठी शासन निर्णयानुसार धान विक्रीसाठी शेतकऱ्यांचे ऑनलाईन नोंदणी करिता दि. 30/11/2022 पर्यंत मुदतवाढ दिलेली असुन धान खरेदी केंद्र सुरु झालेले आहेत. तरी ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली अशा शेतकऱ्यांनी स्वत: सातबारा व इतर आवश्यक दस्ताएवजासह आपल्या नजिकच्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थाचे खरेदी केंद्राशी तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या खरेदी केंद्राशी संपर्क साधुन आपल्या धानाची विक्री करावी व शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा असे उप प्रादेशिक व्यवस्थापक अहेरी (उच्च श्रेणी) यांनी कळविले आहे.