आरोग्यदायी जवसाची लागवड क्षेत्र वाढवावे – डॉ. विजय सिडाम
कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर तर्फे दिनांक 16 नोव्हेंबर 2022 रोजी, एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाचे प्रमुख मार्गदर्शक आणि आयोजक डॉ.विजय एन.सिडाम, विषय विशेषज्ञ, कृषी विस्तार यांनी जवस या तेलबिया पिकाचे एकात्मिक लागवड तंत्रज्ञान, आणि पिकाचे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी बीजप्रक्रिया मध्ये पेरणी पुर्वी प्रति किलो बियण्यास कार्बेन्डाझिम 2 ग्रॅम किंवा थायरम 3 ग्रॅम याप्रमाणे बुरशी नाशकाची बीजप्रक्रिया करावी यामुळें मर व अल्टार्नेरिया ब्लाइट या रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. बीजप्रक्रिया या विषयी सखोल मार्गदर्शन करून शेतकऱ्याना जवस पिकाचे बीजप्रक्रियाचे प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच जवस या पिकाचे महत्व विशद केले त्यामध्ये जवसाचे तेलाचेएकूण उत्पादनापैकी 20 टक्के खाद्यतेल म्हणून तर 80 टक्के तेलाचा औद्योगिक क्षेत्रात साबण, पेन्ट, वार्निश, ताडपत्री व शाही इत्यादीसाठी वापर होतो तसेच जवसाची ढेप दुभत्या जनावरांसाठी उत्तम खुराक आहे. जवसाचे कांड्या पासून तयार होणाऱ्या धाग्याची प्रत चांगली असल्यामुळे पिशव्या, कागद, कापड इत्यादीसाठी याचा उपयोग होतो. आरोग्यासाठी उत्तम अश्या जवस तेलामध्ये 58 टक्के ओमेगा-3, मैदामल आणि ऑंटी अक्सिडेंट आहेत त्यामुळे हृदय रोगास कारणीभूत असलेले विकार जसे रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, गिलीसराईड याचे प्रमाण कमी होते संधिवात सुसह्य होते, मधुमेह आटोक्यात येतो कर्करोग व इतर रोगांना प्रतिकारशक्ती निर्माण होते म्हणून दैनंदिन आहारात जवसाचा वापर नक्कीच करावा तसे डॉक्टर सिडाम यांनी सुचविले. कृषी विज्ञान केंद्र चंद्रपूर तर्फे नागभिड तालुक्यांतील चिंधी चक व सिंदेवाही तालुक्यांतील उमरवाही या गावामध्ये अटारी पुणे अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान NFSM या अभियानांतर्गत जवस या पिकाचे एकूण 50 प्रथमे रेषीय प्रात्यक्षिके राबविण्यात येत आहे त्याकरिता (लातूर जवस -93) हे वाण शेतकऱ्यांना निविष्ठा मध्ये तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कृषी विषयक माहिती संकलित केलेली कृषी संवादिनी सुद्धा वाटप करण्यात आले.जवस या पिकासाठी उपलब्ध बाजार पेठ आणि मूल्यवर्धन या विषयी मार्गदर्शन केले. शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन डॉ. व्हि.जी नागदेवते, वरीष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, के. व्ही. के. सिंदेवाही यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्याकरिता कैलास कामडी यांनी सहकार्य केले.