उत्पन्न वाढ व प्रशिक्षण योजनेसाठी अनुसूचित जमातीच्या बचत गटाकडून प्रस्ताव आमंत्रित

उत्पन्न वाढ व प्रशिक्षण योजनेसाठी अनुसूचित जमातीच्या बचत गटाकडून प्रस्ताव आमंत्रित

 

चंद्रपूर, दि. 15 नोव्हेंबर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर कार्यालयामार्फत उत्पन्न निर्मिती व वाढीच्या योजना तसेच कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणाच्या योजनांसाठी अनुसूचित जमातीच्या महिला, पुरूष बचत गट व समुहांकडून प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहे.

 

उत्पन्न निर्मिती व वाढीच्या योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या बचत गट, समुह यांना टोळीपासून तेल काढण्याचे मशीन पुरवठा करणे. आदिवासी गटांना मशरूम, आंबा इत्यादी संकलीत करून ठेवण्यासाठी सोलर ड्राय मशीनचा पुरवठा करणे या दोन्ही योजनांसाठी प्रशिक्षण देणे व 85 ते 100 टक्के अर्थसहाय देणे. तसेच कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत आदिवासी महिला बचत गटांना मोहफुलापासून विविध वस्तु तयार करण्याचे प्रशिक्षण देणे, या योजनांचा समावेश आहे. यासाठी वरिलप्रमाणे इच्छुक बचत गटांनी अर्ज करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर चे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मुरूगनंथम एम. यांनी केले आहे.