सिंदेवाही पोलिस प्रशासनाच्या वतिने आश्रम शाळेत बालकदिन साजरा….
आज बालक दिनानिमित्त पोलीस प्रशासन सिंदेवाही तर्फे सिंदेवाही तालुक्यात येत असलेल्या शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा मरेगाव येथे भेट देऊन बालक दिन साजरा करण्यात आला.
तसेच पोलीस सारथी मोहिमे अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सुचना देण्यात आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश घारे व महिला पोलिस रुपा राऊत यांनी विद्यार्थ्यांना गुड टच, बॅट टच, लैंगिक अत्याचार, शोषण, तसेच तंबाखू गुटखा असे मादक पदार्थ सेवन न करणे अशा विविध सूचनात्मक मार्गदर्शन केलेत.
विद्यार्थ्यांना खाऊ व भेटवस्तू देऊन बालक दिन साजरा करण्यात आला.
पोलीस काका व पोलीस दीदी यांचे सोबत बालदिन साजरा झाल्यामुळे सर्व बालकांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मिलिंद रंगारी शाळेचे अधिक्षक तसेच प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश घारे, रणधीर मदारे, मंगेश मात्रे, रूपा राऊत व शाळेचे शिक्षक उपस्थित होते.