महिलांचे उत्तम व मजबूत संघटन उभे करणे हे प्रमुख लक्ष्य – सौ. चित्रा वाघ
सौ. चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात भाजपा महिला मोर्चा लक्षणीय कामगिरी करेल – सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूरात भाजपा महिला आघाडीतर्फे प्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांचा भव्य सत्कार व महिला मेळावा संपन्न.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार लोकहितकारी निर्णय घेणारे सरकार आहे. सत्तेत आल्यानंतर अनेक लोकहिताचे निर्णय या सरकारने घेतले आहे. महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळताच मी राज्याचा दौरा विदर्भातुन सुरू केला. महिलांचे उत्तम व मजबुत संघटन उभे करणे हे आपले प्रमुख लक्ष्य आहे. बुथ तेथे २५ महिला कार्यकर्त्या आपण उभ्या करणार असल्याचे प्रतिपादन भाजपा महिला आघाडीच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी केले.
दिनांक १३ ऑक्टोंबर रोजी चंद्रपूरातील महेश भवन येथे भाजपा महिला आघाडी चंद्रपूर महानगर व चंद्रपूर जिल्हा ग्रामीण यांच्यातर्फे भव्य महिला मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात सौ. चित्रा वाघ यांचा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. वनिता कानडे, प्रदेश कार्यकारीणी सदस्या सौ. रेणुका दुधे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा (ग्रामीण) अलका आत्राम, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा चंद्रपूर महानगर सौ. अंजली घोटेकर, माजी उपमहापौर राहूल पावडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस संजय गजपूरे, नामदेव डाहूले, सुभाष कासनगोट्टूवार, सौ. वंदना आगरकाठे, सौ. शिला चव्हाण, विजयालक्ष्मी डोहे, रत्नमाला भोयर, सुर्या खजांची, शायरा शेख, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सौ. चित्रा वाघ म्हणाल्या, केंद्र व राज्य शासनाच्या महिला विकासाच्या विविध योजना, चांगले निर्णय तळागाळातील सामान्य महिलांपर्यंत पोहचविणे हा भाजपा महिला मोर्चाचा प्राधान्यक्रम असणार आहे. महिलांवर होणारे अत्याचार आपण खपवून घेणार नाही. याविरोधात महिला मोर्चाचा एल्गार कायम सुरू राहील असेही त्या म्हणाल्या. यावेळी बोलताना सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, प्रत्येक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्याने सौ. चित्रा वाघ यांचा आदर्श ठेवावा असे त्यांचे कार्य आहे. राजकीय असुयेतुन होणा-या अनाठायी टिकेला न घाबरता अभ्यासपूर्ण पध्दतीने चित्राताई या क्षेत्रात कार्यरत आहे. पदाला महत्वाचे न मानता महिलांसाठी काम करणे, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी परिश्रम घेणे याबाबींना चित्राताईंनी कायम प्राधान्य दिले. त्यांच्या नेतृत्वात भाजपा महिला मोर्चाचे संघटन लक्षणीय कामगिरी करेल असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सौ. चित्रा वाघ यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी देवराव भोंगळे, सौ. वनिता कानडे, अलका आत्राम आदींची जोरदार भाषणे झालीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. अंजली घोटेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. लक्ष्मी सागर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन रंजना किन्नाके व निलम सुरमवार यांनी केले. यावेळी विविध पक्षातुन भाजपात प्रवेश घेतलेल्या महिलांचा प्रवेश करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच नुकत्याच निवडून आलेल्या महिला सरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लोहारा येथील समुहाने गोंडी नृत्य सादर केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्षा सोमलकर, सिंधु राजगुरे, विशाखा राजुरकर, रेणुका घोडेस्वार, मनिषा महातव, प्रभा गुडधे, स्वाती देवाळकर, कविता जाधव, सविता कांबळे, छबू वैरागडे, वनिता डुकरे, माया उईके, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा गंधेवार आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला सर्व मंडळ अध्यक्ष, महानगर महिला पदाधिकारी, ग्रामीण भागातील तालुकाध्यक्ष आदींची मोठया संख्येने उपस्थिती होती.