पोलिस स्टेशनमधील भंगार मोटार सायकल विक्रीसाठी निविदा आमंत्रित Ø 16 नोव्हेंबर रोजी होणार लिलाव
चंद्रपूर दि. 9 नोव्हेंबर : पोलिस स्टेशन, रामनगर येथे बरेच कालावधीपासून जमा असलेले पाच मोटार सायकल व एक चार चाकी वाहनावर हक्क सांगण्यासाठी कोणीही हजर न झाल्याने सदर वाहनाची 16 नोव्हेंबर 2022 रोजी लिलावाद्वारे भंगारमध्ये विक्री करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक खरेदीदारांकडून सीलबंद निविदा मागविण्यात आल्या आहेत.
सदर भंगाराची शासकीय किंमत 41 हजार रूपये मुल्यांकित करण्यात आली असून वाहने परिक्षण 14 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत करता येणार आहे. तसेच अमानत रक्कम 4100 रूपये भरून नोंदणी देखील 14 नोव्हेंबर रोजी याच वेळेत करावयाची आहे. भंगार वाहनाचा लिलाव 16 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत पोलिस स्टेशन रामनगर येथे करण्यात येणार आहे.
वरीलप्रमाणे नमुद स्थावर मालमत्तेची जशी आहे तशी, जिथे आहे तिथे व ज्या स्थितीत आहे तशी विक्री केली जाईल. लिलावाच्या वेळी व ठिकाणी तपशीलवार अटी व शर्ती वाचण्यात येईल. विक्री रक्कमेच्या 10 टक्के रक्कमेचा (अमानत) भरणा केल्यावर लिलाव बोली बोलून झाल्यानंतर ज्यांचे नावाने सदर वाहनांचा लिलाव मंजुर होईल, त्या खरेदीदारास उर्वरीत रक्कमेचा भरणा त्वरीत लिलावाचे ठिकाणीच भरणे बंधनकारक राहील. जर सदरचा भरणा त्वरीत मुदतीत केला नाही. तर भरलेली 10 टक्के रक्कम कोणत्याही प्रकारची नोटीस न देता जप्त करण्यात येईल व सदरची मालमत्ता विक्रीची कार्यवाही पुन्हा करण्यात येईल.
वाहनाचे इंजीन व चेचीस नंबर मिटवून व वाहनाचे तुकडे करून भंगारमध्ये विक्री करण्यात येणार आहे. जे खरेदीदार अमानत भरणा भरतील फक्त त्याच खरेदीदारास विक्री बोली लिलावमध्ये प्रवेश मिळेल. सदर लिलावाच्या बोली/ऑफर स्वीकारणे न स्वीकारणे लिलाव कायम करणे, पुढे ढकलने किंवा रद्द करणे व इतर कोणतेही कारण न देता सर्व अधिकार ठाणेदार पोलिस स्टेशन रामनगर यांचे राहील, असे पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांनी कळविले आहे.