हिंदू राष्ट्र समूह व स्वराज फाउंडेशनतर्फे स्वच्छता अभियान
चंद्रपूर ३० ऑक्टोबर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लोकसहभागातुन चंद्रपूर शहर ” स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धा ” आयोजित केली गेली असुन स्पर्धेअंतर्गत हिंदू राष्ट्र समूह व स्वराज फाउंडेशन कडून सकाळी ८ वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या भिंतीशिल्प परिसरात परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर असुन अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
” माझ्या शहरासाठी माझे योगदान ” या थीमवर वार्डस्तरीय स्पर्धा १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत आयोजित केली गेली असुन सदर स्पर्धेत नागरिक गट बनवुन सहभागी झाले आहेत. या अभियानात हिंदुराष्ट्रम समूह व स्वराज फाउंडेशनचे संयोजक देवानंद साखरकर, श्याम हेडाऊ, नंदू लभाने, प्रियंका पूनवटकर, चेतन धाबेकर, नितिन कार्य, चेतन पटेल, समीर लाभे, राहुल अवताडे, श्रद्धा महाजन, श्वेताली कोकळे, रुतू माने यांनी सहभाग घेतला.
या स्वच्छता कार्यक्रमाला वॉर्डच्या नगरसेविका छबूताई वैरागडे, सुरेश बंडीवार यांची उपस्थिति होती. चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी यांनीही या कामास पूर्ण सहकार्य करून परिसर स्वच्छ करण्यास मदत केली.