स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान अंतर्गत पिक विमा कंपनीस सूचना देणेबाबत
गडचिरोली, दि.21: राज्यात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे त्याठिकाणी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान होतआहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती याबाबी अंतर्गत विमासंरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्या सत्याअधि सूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांतर्गत विमा संरक्षित क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा पुराचे पाणी शेतात शिरून, शेत दीर्घकाळ जलमय राहिल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. तर त्याबाबती मध्ये सदर नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत आपल्या विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाले याबाबतची सूचना आपल्या संबंधित विमा कंपनी यांना देण्याकरता पुढील पर्यायांचा वापर करता येतो.
1)क्रॉपइन्शुरन्सॲप,2)विमा कंपनी टोलफ्री क्रमांक,3)विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय,4.कृषि
विभागाचे मंडळ कृषी अधिकारी कार्यालय 5.ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा.
प्रधान मंत्री पिक विमा योजने अंतर्गत केंद्र शासनाचे पिक विमा पोर्टलवर सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे पीक नुकसानीच्या सूचना देण्साठी सध्या अडचणी येत असल्याने ऑफलाइन पद्धतीने कंपन्यांना पिक नुकसानीच्या सुचना (Intimation) देण्यासाठी सर्व कंपन्यां मार्फत सूचना अर्ज छापील प्रती कंपन्यां मार्फत क्षेत्रीय कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सदर अर्जाव्दारे कंपनीकडे व क्षेत्रीय कृषि कार्यालये यांचेकडे शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत.
कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन आपल्या विमा काढलेल्या पिकांच्या नुकसानी बाबत संबंधित विमा कंपनीला ऑफलाइन पद्धतीने सूचना (Intimation) देण्या बाबत कृषि विभागामार्फत अवाहन करण्यात येत आहे.असे कृषि उपसंचालक (सां-१) कृषि आयुक्तालय,पुणे,अरुण कांबळे यांनी कळविले आहे.