अनुदानित दराने मिळणार शेतकऱ्यांना हरभरा, गहू, बियाणे
भंडारा दि.17 : गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व ग्रामबिजोत्पादन यावर्षी योजनेअंतर्गत महाबीजच्या वतीने विक्रेत्यामार्फत अनुदानित हरभरा बियाणे उपलब्ध होणार आहे.
दहा वर्षाच्या आतील पीकेव्ही कांचन, फुले विक्रम, फुले विक्रांत, राजविजय-202 या हरभरा बियाण्याचे दर बाजारात 70 रूपये प्रती किलो आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत महाबील कडून यावर 25 रूपये अनुदान असून, शेतकऱ्यांना महाबीजचे हेच बियाणे बाजारात 45 रूपये प्रती किलोप्रमाणे उपलब्ध आहे. ग्राम बिजोत्पादन योजने अंतर्गत 10 वर्षा आतील हरभरा बियाणे एवढ्याच अनुदानावर शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये पीकेव्ही कांचन, फुले विक्रम, फुले विक्रांत, राजविजय-202 हे हरभरा बियाणे जॅकी-9218, दिग्विजय, विजय, विशाल, विराट या हरभरा बियाण्यांवर प्रती किलो 20 रूपये अनुदान आहे. बाजारात हे बियाणे 70 रूपये प्रति किलो असून अनुदानावर शेतकऱ्यांना हे बियाणे 50 रूपये प्रति किलोप्रमाणे मिळणार आहे.
गोंदिया जिल्ह्यात यावर्षीच्या रब्बी हंगामासाठी 10 वर्षावरील गहु बियाणे एमएएसीएस-6222 बियाणे बाजारात 42 रूपये किलो आहे. महाबीजच्या या बियाण्यास 15 रूपये अनुदान असून हे बियाणे 27 रूपये प्रती किलोप्रमाणे मिळणार आहे.
गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेअंतर्गत उपलब्ध होणारी मात्रा 10 वर्षाआतील हरभरा बियाणे 822 क्विंटल, ग्रामबिजोत्पादन योजनेअंतर्गत 10 वर्षाआतील हरभरा बियाणे 380 क्विंटल व 10 वर्षावरील हरभरा बियाणे 188 क्विंटल अशी एकूण 568 क्विंटल मात्रेचे वाटपाचे नियोजन आहे. तसेच 10 वर्षावरील गहू बियाणे एमएसीएस-6222 वाणाचे 70 क्विंटल वाटपाचे नियोजन आहे.
वरील सर्व बियाणे अनुदानित दराने शेतकऱ्यांना मिळण्याबरीता गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बियाणे उपलब्ध करण्यात आलेले असून शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या शासकीय पोर्टलवर नोंदणी करून या योजनेचा लाभ घेता येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाबीज भंडारा- गोंदिया ए.एन.गावंडे यांनी केले आहे.