आयुक्तांच्या हस्ते खाद्यपदार्थांची विक्री व प्रदर्शनीचे उदघाटन
३० महिला गटांचा सहभाग
चंद्रपूर १७ ऑक्टोबर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित ५ दिवसीय महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री व प्रदर्शनीचे उदघाटन आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
या प्रसंगी बोलतांना आयुक्त म्हणाले कि, महिला बचतगटांच्या मार्फत मोठी नारीशक्ती व्यवसायात जुळून असुन या माध्यमातुन मोठी व्यावसायिक साखळी निर्माण होण्यास मदत मिळते. अर्थव्यवस्थेला चालना देण्याची प्रमुख भूमिका महिला करू शकतात. बचतगटांच्या माध्यमातुन सांघिकपणे कार्य केल्या महिलांना स्वतः आर्थिक, सामाजिक, शैक्षणीक दर्जा उंचावण्यास मदत मिळणारआहे.
दि.अं.यो. – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय, कस्तुरबा रोड,ज्युबली शाळेजवळ असलेल्या कार्यालयाच्या प्रांगणात सदर प्रदर्शनी असुन ३० महीला बचत गटांनी सहभाग घेतला आहे. दिवाळी फराळाच्या वस्तु विक्री करणारे १२ स्टॉल, दिवे व शोभेच्या वस्तुंची विक्री करणारे १५ गट तर इतर वस्तूंची विक्री करणारे ३ असे एकूण ३० गटांनी सहभाग घेतला आहे. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत १००० च्या वर महिलांचे बचत गट स्थापन करण्यात आले आहे. या योजेनच्या माध्यमातुन बऱ्याच बचत गटांनी कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. तसेच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उदयॊग योजेनेमाध्यमाने २२ बचत गटांना ३८ लक्ष रुपयांचे कर्ज प्राप्त झाले आहे.
सकाळी १० ते रात्री १० पर्यंत सुरु असणाऱ्या या विक्री व प्रदर्शनीत नागरिकांना स्वस्त दरात मुबलक खाद्य पदार्थ व वस्तु घेता येणार आहे. यात दिवाळी सणानिमित्त महिला बचत गटांनी तयार केलेले चकली, चिवडा, लोणचे, फराळी वस्तूंचा आस्वाद घेता येणार आहे तसेच कापडी बॅग, दिवे, मातीच्या वस्तु अश्या अनेक वस्तुही विक्रीस राहणार आहेत. सदर विक्री व प्रदर्शनी १७ ते २१ ऑक्टोबरपर्यंत असल्याने नागरिकांना भेट देण्यास ५ दिवस मिळणार आहे. तसेच सकाळी १० ते रात्री १० पर्यंत सुरु असल्याने सर्व वयोगटाच्या व्यक्तींना भेट देता येणार आहे.
याप्रसंगी उपायुक्त अशोक गराटे, शहर अभियंता महेश बारई, सहायक आयुक्त सचिन माकोडे, एनयुएलएम विभाग प्रमुख रफीक शेख, शहर अभियान व्यवस्थापन रोशनी तपासे, चिंतेश्वर मेश्राम तसेच सर्व महिला बचत गटाच्या सदस्य उपस्थीत होत्या.