सारस संवर्धनासाठी भंडारा जिल्हयात सारस मित्रांची नियुक्ती
भंडारा दि. 07 :जिल्हयातील दुर्मिळ सारस पक्षाच्या संवर्धनासाठी सारस मित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सारस मित्र नियुक्तीचे आदेश नुकतेच पारित केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिकेला अनुसरून दिलेल्या निर्देशान्वये जिल्हयात सारस संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या बैठकीत स्थानिक स्वयंसेवक व शेतकरी यांना सारसमित्र म्हणून नियुक्त करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार जिल्हयातील सेव इकोसिस्टीम ॲन्ड टायगर या संस्थेने सारसमित्रांची नावे सुचविली असून त्यानुसार 9 सारसमित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यामध्ये अतुल ढबाले, नंदलान ढबाले (वाहनी,ता.तुमसर), विजयकुमार सिंगने (पिपरी चुन्नी,ता.तुमसर), अजहर पाशा (चिखला,ता.तुमसर), रंजीत आहिगर (गोबरवाही,ता.तुमसर), युवराज बघेले (बिनाकी,ता.तुमसर), निरज बन्सोड (गोंडीटोला,ता.तुमसर) भाऊदास बोरघरे, सुनिल सोनवाने (उमरवाडा,ता.तुमसर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.