विविध पुरस्कारांसाठी 2022 करीता अर्ज आमंत्रित
गडचिरोली,दि.06: भारत सरकार, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय,नवी दिल्ली यांनी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, खेळामध्ये यश संपादन केल्याबद्दल ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॅाफी (विद्यापीठांकरीता), द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार अर्जून ॲवार्ड, 2022 करीता पुरस्कारासाठी नामनिर्देशनाचा प्रस्ताव दि. 20 सप्टेंबर, 2022 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत केंद्रशासनास सादर करावा,तसेच विहीत कालावधीनंतर प्राप्त होणारे अर्ज अथवा अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही असे नमूद केलेले आहे. तसेच यावर्षीपासून पात्र खेळाडूंनी पुरस्काराकरीताच्या मार्गदर्शक तत्वानुसार (Award Guidelines) अर्जदारांनी स्वत: फक्त ऑनलाईन पोर्टलद्वारे आपले विहीत नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची/ अथवा व्यक्तींची शिफारस न घेता थेट केंद्रशासनास dbtyas-sports.gov.in या पोर्टलवर/वेबसाईटवर सादर करावे, असे सुचित केले आहे. तसेच ऑनलाईन अर्जाबाबत काही अडचण आल्यास Department of Sports At section.sp4-moyas@gov.inकिंवा 011-23387432 या संपर्क क्रमांक वर कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत सकाळी 9.00 ते सायं 5.30 पर्यंत संपर्क करता येईल. तसेच केंद्रशसनाच्या विविध पुरस्कारांची सविस्तर माहिती, नियमावली व विहीत नमुना अर्ज https://yas.nic.in/sportsया वेबसाईटवर उपलब्ध आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी कळविले आहे.