गडचिरोली : राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
गडचिरोली, दि.05: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, म.रा.पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेमध्ये क्रीडा वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी स्व.मे.ध्यानचंद, हॉकीचे जादूगार यांचे जयंती निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा क्रीडा संकुल, गडचिरोली येथे खो-खो, कुस्ती, बॉक्सिंग या खेळांचे प्रदर्शनीय सामने घेण्यात आले, तसेच तालुका क्रीडा संकुल, आरमोरी येथे हॉकी व बॉस्केटबॉल या खेळाचे प्रदर्शनिय सामने घेण्यात आले. महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालय,आष्टी येथे आर्चरी या खेळाचे प्रदर्शनीय सामने घेण्यात आले. सदर कार्यक्रमात 100 ते 150 खेळाडूंनी सहभाग घेतला. कार्यक्रमात जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, क्रीडा संयोजक खुशाल मस्के, क्रीडा अधिकारी घनश्याम वरारकर, सिकई मार्शल आर्ट प्रशिक्षक संदिप पेदापल्ली, खो-खो प्रशिक्षक प्रविण बारसागडे, वरिष्ठ लिपीक विशाल लोणारे इत्यादी उपस्थित होते. कार्यालयाचे संचालन व आभार प्रदर्शन क्रीडा मार्गदर्शक एस.बी. बडकेलवार यांनी केले.