अनुसूचित जातीतील युवक व युवतींकरीता उद्योजकता विकास शिबीर
18 दिवसांचे नि:शुल्क निवासी उद्योजकता प्रशिक्षण
भंडारा, दि. 1 : अनुसूचित जातीतील युवक व युवतींकरीता 18 दिवसीय नि:शुल्क निवासी उद्योजकता प्रशिक्षण आयोजीत करण्यात येणार आहे. या साठी विस्तृत माहिती देण्याकरीता एक दिवसीय उद्योजकता विकास शिबीर येत्या 6 सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित केले आहे.
उत्कृष्ट प्रशिक्षणाद्वारे यशस्वी उद्योजक बनविण्यासाठी अनुसूसित जमातीच्या युवक युवतींना प्रोत्साहीत करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. उद्योग विभाग मुंबई व मिटकॉन लि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे हे प्रशिक्षणात विनामुल्य व निवासी स्वरूपाचे असून यामध्ये शासनाच्या विविध योजना, व्यक्तिमत्व विकास उद्योग संधी, विपणन कौशल्य, बाजारपेठ पाहणी व पॅकेजींग यावर मार्गदर्शन करण्यात येईल.
प्रत्यक्ष मुलाखातीतून 40 प्रशिक्षणार्थींची निवासी प्रशिक्षणाकरीता निवड करण्यात येईल. अधिक माहिती करीता विजय सेलोकार, मिटकॉन भंडारा किंवा ज्ञानेश्वर चौधरी यांच्याशी 9423413738, 7755916141 या क्रमांकावर संपर्क साधावा.