माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांकरीता प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना
Ø शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 29 ऑगस्ट : माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांनी शैक्षणिक वर्ष सन 2021-22 मध्ये इयत्ता 12 वी मध्ये 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे व शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी कोणत्याही व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला असल्यास असे विद्यार्थी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास पात्र आहेत.
सदर शिष्यवृत्ती योजनेचे ऑनलाईन अर्ज www.ksb.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत आहे. विद्यार्थ्यांनी मुळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे स्कॅन करून प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जासह अपलोड करावे. अपूर्ण किंवा चुकीचा अर्ज भरला असल्यास नाकारण्यात येईल. तरी, माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांनी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.