जिल्हास्तरीय जेष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समिती सभा संपन्न
भंडारा. दि. 29 : ज्येष्ठ नागरिक धोरणची अंमलबजावणी करण्याकरता ज्येष्ठ नागरिकांबाबत गठीत जिल्हास्तरीय समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये जिल्हाधिकारी महोदयांनी विविध विभागाद्वारे जिल्हास्तरावर आधी मी अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जेष्ठ नागरिकांना सेवा पुरवण्याचे करण्याचे निर्देश दिले. तसेच कृती आराखड्यानुसार विभाग प्रमुखांना कार्यवाटून द्यावेत व त्यांच्याकडून कार्यवाही अहवाल मागवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले. यावेळी अशासकीय सदस्य हिरामणजी लांजेवार व सदानंद मोहदुरे यांनी शहीद स्मारकेचे जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र परिसर बागेतील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली असता त्यावर नगरपरिषद भंडारा यांच्याकडून कार्यवाही सुरू असून लवकरच कार्याला प्रारंभ होईल असे जिल्हाधिकारी श्री .कदम यांनी सांगितले .यावेळी समितीचे सदस्य समाज कल्याण श्रीमती तेलगोटे व अन्य शासकीय अशासकीय सदस्य उपस्थित होते.