मानसिक विकलांग महिलेचे सखी वन स्टॉप सेंटरद्वारा पुनर्वसन
गडचिरोली, दि.29: संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाकडून सखी वन स्टॉप सेंटर ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेच्या निकषानुसार शारीरीक, लैगींक, भावनिक, मानसिक आणि आर्थिक शोषनाला बळी पडलेल्या अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीसह सर्व महिलांना आवश्यक ती मदत केली जाते. हिंसाचाराच्या विरोधात लढण्यासाठी एकाच छताखाली वैद्यकीय सेवा, कायदेशीर मदत व समुपदेशन, पोलीस मदत, तात्पुरती निवासाची सोय, मानसिक समुपदेशन, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा, रेस्क्यु सर्विसेस व आपतकालीन सेवा तात्काळ उपलब्ध करुन दिल्या जातात.
मानसीक विकलांग महिला आरमोरी परीसरातील रहिवासी असुन भटकत-भटकत जि. जालना, राज्य – महाराष्ट्र येथे जाऊन पोहचली. सदर पीडीत महिला हरविलेली असल्याचे दिसुन आल्याने जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जालना यांनी बाल कल्याण समिती जालना यांचे समोर सादर करुन समुपदेशन केले असता आरमोरी परिसरातील असल्याचे सांगीतले. त्या अनुषंगाने बाल कल्याण समिती जालना यांचे आदेशान्वये जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जालना यांनी दिनांक 09/08/2022 रोजी बाल कल्याण समिती, गडचिरोली यांचे समोर सादर करण्यात आले. पिडीत महिला ही 21 वर्षांची असल्याने बाल कल्याण समिती, गडचिरोली यांचे मार्फत दिनांक 09/08/2022 रोजी सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली येथे दाखल करण्यात आले. त्याअनुषंगाने पिडीत महिलेची विचारपूस व समुपदेशन केले असता आरमोरी परिसरातील असल्याचे सांगीतले तसेच मानसीक विकलांग असल्याचे दिसुन आले तेव्हा सदर पीडीत महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील मानसीक विभागामध्ये उपचाराकरीता दाखल करण्यात आले. सदर पीडीत महिलेच्या सांगण्यावरुन स्थानिक पत्त्यावरील पोलीस पाटील यांना फोन करुन माहिती घेतली असता पीडीत महिला ही स्थानिक पत्यावरील आरमोरी परिसरातील असल्याची ओळख पटली. सदर पीडीत महिलेच्या पत्यावर प्रत्यक्ष भेट देऊन पोलीस पाटील व सरपंच यांना भेटुन तेथील वस्तुस्थिती निदर्शक गृहचौकशी केली असता पीडीताची आई जिवंत असुन सदर पीडीत महिलेची काळजी घेण्यास व घरी ठेवण्यास सक्षम नसल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने पीडीत महिला ही पोलीस स्टेशन आरमोरी हद्दीतील येत असल्यामुळे मा. पोलीस निरीक्षक, स्थानिक पोलीस स्टेशन आरमोरी यांना भेटुन पीडीत महिलेची प्रथम खबरी अहवाल नोंद करुन घेण्यात आले. हेल्थ ॲक्ट 2017 नुसार पोलीस स्टेशन आरमोरी यांचे मार्फत मा. न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी आरमोरी यांचे समोर सादर करण्यात आले.
मा. न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी आरमोरी यांचे आदेशान्वये व पोलीस स्टेशन आरमोरी यांचे सहकार्याने तसेच सखी वन स्टॉप सेंटर मार्गदर्शक सुचना व योजनेच्या मुख्य हेतुनुसार पिडीत महिलेच्या सोयीनुसार सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली मार्फत सदर मानसिक विकलांग महिलेला आवश्यक ती मदत करुन योग्य उपचाराकरीता प्रादेशीक मानसीक रुग्णालय, नागपुर येथे दिनांक 23/08/2022 रोजी पुनर्वसन करण्यात आले.
सदर कार्यवाही मा. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. प्रकाश भांदककर यांचे मार्गदर्शनात व मा. पोलीस निरीक्षक, स्थानिक पोलीस स्टेशन आरमोरी यांचे सहकार्याने तसेच समन्वयाने सखी वन स्टॉप सेंटर येथील सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रयत्नाने पुर्ण करण्यात आले.