धनगर समाज घरकुल योजनेंतर्गत तीन हजाराहून अधिक लाभार्थ्यांना लाभ
भंडारा, दि. 25 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे ग्रामीण भागातील धनगर समाजातील घटकांसाठी राज्यात धनगर समाज घरकुल योजनेत जिल्हयात आतापर्यंत 3 हजार 64 पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.
धनगर समाज (भज – क) या प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्यांच्या उत्पन्नाचे स्तोत्र वाढून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी व त्यांना विकासाचे मूळ प्रवाहात येता यावे. या उद्देशाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे ग्रामीण भागातील धनगर समाजातील घटकांसाठी राज्यात धनगर समाज घरकुल योजना राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने धनगर समाज घटकांतील समाजबांधवांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता संबंधित ग्रामपंचायतीशी संपर्क साधून वैयक्तिक घरकुलासाठी त्वरीत परिपूर्ण अर्ज सादर करावा. विमु्क्त जाती व भटक्या जमाती घटकांकरिता घरकूल योजना राबविण्यात येतात. यासोबतच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजने अंतर्गत जिल्हास्तरीय समितीने 743 प्रस्तावांना प्रशासकीय मंजूरी प्रदान केली आहे.
तरी जिल्हयातील विमुक्त जाती भटक्या जमाती व धनगर समाज या प्रवर्गातील घटकांनी अधिक माहिती व योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुकेशीनी तेलगोटे यांनी केले आहे.