सेवादलातील मतदारांसाठी छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

सेवादलातील मतदारांसाठी छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

गडचिरोली, दि.22: दिनांक 1 जानेवारी,2023 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढिल प्रमाणे मतदार यादीच्या शेवटच्या भागाचे प्रारुप प्रकाशन दिनांक 9 नोव्हेंबर 2022, रेकार्ड ऑफीसर, कमांडींग ऑफिसर किंवा संबंधित अधिकारी यांच्याकडून फॉर्म प्राप्त करण्याच्या कालावधी, दिनांक 8 डिसेंबर 2022, इआरओ कडून स्वाक्षरी केलेल्या आणि सत्यपित फॉर्मसह फाईल्सची प्रक्रिया व विल्हेवाट दिनांक 26 डिसेंबर 2022, एक्सएमएल फाईल आणि फॉर्म पुन्हा सादर करणे, दिनांक 3 जानेवारी 2023, मतदार यादीच्या शेवटच्या पानाचे प्रारुप अंतिम स्वरुपात प्रकाशित करणे दिनांक 5 जानेवारी 2023 ही आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.