प्रशिक्षणाच्या योजना राबविण्याकरिता सेवाभावी संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित
चंद्रपूर, दि. 19 ऑगस्ट : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर या कार्यालयामार्फत विविध योजना राबविल्या जातात. राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाच्या योजनेकरीता शासकीय निमशासकीय सेवाभावी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे.
सदर योजनांमध्ये एम.एस.सी.आय.टी, संगणक टंकलेखन, अनुसूचित जमातीचे बचत गट, समूहांना टोळीपासून तेल काढण्याचे प्रशिक्षण देणे व मशीनचा पुरवठा करणे, आदिवासी गटाला मशरूम, आंबा इत्यादी संकलित करून ठेवण्यासाठी सोलर ड्राय मशीनचा पुरवठा करणे, आदिवासी महिला बचत गटाला मोहफुलापासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देणे आदी योजना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत राबविल्या जातात.
या प्रशिक्षणाच्या योजना राबविण्याकरीता इच्छुक शासकीय, निमशासकीय, सेवाभावी संस्थांनी सात दिवसाच्या आत कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.