चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत
चंद्रपूर, दि. 17 ऑगस्ट : स्वराज्य महोत्सव अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आज (दि.17) सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात आले. याच उपक्रमाचा भाग म्हणून संपूर्ण राज्यात बुधवारी सकाळी 11 वाजता सर्वांनी एकाच वेळी सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्याच्या शासनाच्या सूचना होत्या. त्यानुसार चंद्रपूर जिल्हा प्रशासनाद्वारे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रगीतानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, प्रशासकीय इमारत येथील सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.