चंद्रपूर मनपा शाळांमध्ये सांस्कृतीक कार्यक्रम
चंद्रपूर 14 ऑगस्ट- चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आज दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत मनपाच्या सर्व शाळांमध्ये ध्वजारोहणा सोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
महानगरपालिकेच्या डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम प्रा.शाळा,रयतवारी कॉलरी प्रा.मराठी शाळा, डॉ.राजेंद्र प्रसाद प्राथमिक, महाकाली कॉलरी मराठी प्राथमिक शाळा, कर्मवीर कन्नमवार प्राथमिक शाळा, पं.दिनदयाल उपाध्याय शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ध्वजारोहण करण्यात आले तसेच सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक शाळा येथे चित्रकला स्पर्धा तर लोकमान्य टिळक प्रा.शाळेत देशभक्तीपर गीत व सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळेमध्ये देशभक्तीपर नृत्यांचा कार्यक्रम घेण्यात आला.
वल्लभभाई पटेल शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशी देशभक्तीपर विषयावर चित्रे काढली. लोकमान्य टिळक प्रा. शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर अश्या देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर अतिशय उत्कृष्ट नृत्यांचे सादरीकरण केले. सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळेमध्ये देशभक्तीपर नृत्यांचा कार्यक्रम घेण्यात आला. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर अतिशय उत्कृष्ट नृत्यांचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमात नर्सरी पासून ते इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. आयुक्त राजेश मोहीते यांच्या मार्गदर्शनात मनपा शिक्षणाधिकारी नागेश नीत यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात अमृत महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात सर्व शिक्षक व शिक्षकांनी सहकार्य केले.