रॅलीद्वारे झाला पोषणाचा जागर हर घर तिरंगा…हर घर पोषण
भंडारा, दि. 12 : भारतीय स्वातंत्रयाला 75 वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत “ हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्यावतीने “ हर घर तिरंगा…हर घर पोषण ” हया उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद भंडारा मधून जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपरिषद, लाल बहादूर शास्त्री शाळा चौक ते रेल्वेच्या अखत्यारीतील मोकळी जागा खात रोड पर्यंत महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती भंडारा व माविम यांच्या संयुक्त विदयमाने दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी “हर घर तिरंगा” महारॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅलीचे उदघाटन संदिप कदम, जिल्हाधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखवून केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप चौधरी , महिला व बालकल्याण सभापती स्वाती वाघाये, पंचायत समिती सभापती रत्नमाला चेटुले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि) मनिषा कुरसंगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) किरण कोवे, गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदिप काठोळे, उमेदचे गौरव तुरकर, जिल्हा परिषद सदस्य यशवंतजी सोनकुसरे, जिल्हा परिषदा सदस्या पुजा हजारे व इतर जिल्हा परिषद सदस्य, इतर अधिकारी व कर्मचारी तसेच कोब्रा बटालीयन कमांडो मधील अधिकारी वर्ग व सहकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद भंडारा, पंचायत समिती भंडारा अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांची भव्य दुचाकीसह महारॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विशेषत: मोठया प्रमाणात महिला कर्मचारी सहभागी होत्या. यावेळी सर्वांनी तिरंगा मधील तिन्ही रंगाचे वस्त्र परिधान केलेले होते.. सदर रॅली हि “भारत माता कि जय, हर घर तिरंगा” हया नारांचा उदघोष करीत जिल्हा भंडारा मधून जिल्हाधिकारी कार्यालय त्यानंतर नगरपरिषद भंडारा, लालबहादूर शास्त्री शाळा, हया मार्गाने जावून रॅलीचा समारोप खात रोडवरील मोकळया जागेमध्ये झाला. सदर मोकळया जागेवर रॅलीमध्ये सहभागी असलेल्यांनी स्वातंत्रयाचा अमृत महोत्सवाचा लोगो तयार करण्यात आला. सदर बाब हि रॅलीचे मुख्य आकर्षण होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद भंडारा, महिला आर्थिक विकास महामंडळ, पंचायत समिती भंडारा व उमेदच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.