मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वजाचे वितरण
चंद्रपूर १२ ऑगस्ट – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 11 /8/2022 रोजी सकाळी 7.15 वाजता आयुक्त बंगाली कॅम्प झोन ३ अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना अमृत महोत्सवाचा उल्लेख असणारी टोपी,बॅच तसेच राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले.
चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश मोहीते, सहा. आयुक्त श्री.राहुल पंचबुद्धे यांच्या हस्ते महानगरपालिकेचे स्वच्छता निरिक्षक, प्रभाग शिपाई तसेच कंत्राटी कामगार यांना वितरण करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रध्वज उंचावण्यासंबंधी ध्वजसंहिता उपस्थितांना समजावुन सांगण्यात आली.