बचत गट महिलांसाठी अर्थ सहायता शिबीराचे आयोजन
चंद्रपूर १२ ऑगस्ट – चंद्रपूर शहर महानगरपालिका दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत बचत गट महिलांसाठी अर्थविषयक सहायता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
बँक ऑफ इंडिया जटपुरा शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री. हुसेन आणि डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर मेश्राम यांनी याप्रसंगी महिलांना मार्गदर्शन केले. दरदिवशी अथवा महिन्यातुन केली जाणारी बचत फार महत्वाची आहे . आजची थोडीशी बचत उद्याचा मोठा उद्योग उभा करू शकते. या बचतीमुळे आपण स्वयंपुर्ण होऊ शकतो आणि हीच बचत सामुहिकरित्या केली तर स्वतः सोबत परिसराचा, गावाचा विकास घडवुन आणण्याची क्षमता स्वसहाय्य बचत गटामुळे निर्माण होते.
आज या सायबर युगात ऑनलाईन फसवणुकीपासुन सावध राहणे गरजेचे आहे. मोबाईल हाताळतांना, ऑनलाईन पैश्यांचे व्यवहार करतांना शिक्षण व व्यवहारचातुर्य असणे गरजेचे आहे. तेंव्हा सावधगिरी बाळगा व आपल्या बचतीचे रक्षण करा. बँकेमार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा व योजनांची माहीतीही याप्रसंगी हुसेन यांनी दिली. याप्रसंगी रफीक शेख,चिंतेश्वर मेश्राम, समुदाय संघटिका सुषमा करमनकर,रेखा पाटील, पांडुरंग खडसे, मून, लोणारे उपस्थित होते